Sunday, September 25, 2011

अल्बर्ट आईनस्टाइन ( भाग १ )








     रेडियमसारख्या मूलद्र्व्यातून बाहेरून कोणतीही ऊर्जा न मिळताही एवढी ऊर्जा कशी बाहेर पडते हे कित्येक दिवस एक कोडे होते अशा बर्‍याच कोड्यांची उत्तरे २० व्या शतकात मिळाली एकंदर विज्ञानाचा इतिहास पुढील प्रमाणे सांगता येईल; १५ व्या शतकात गॅलिलीओने विज्ञानाची बांधणी सुरु केली, १६व्या व १७व्या शतकात न्यूटनने विज्ञानाचा पाया रोवला, १८व्या व १९व्या शतकात डार्विन,पाश्चर, फ्लेमिंग यांनी विज्ञानाची भिंत भक्कम केली तर २०व्या शतकात आईनस्टाइन, क्यूरी, बोहर, वॅटसन यांनी विज्ञान सर्वस्व बनवले.पण हे सर्व करण्यासाठी शेकडो संशोधकांनी स्वत:ला झोकून दिले. अशाच एका महान शास्त्रज्ञाच्या कामगिरीचा आपण आढावा घेणार आहोत.


Monday, September 12, 2011

आइनस्टाइन पूर्वीचे विज्ञान

    १५ व्या शतकापासून वैज्ञानिक क्रान्तीला सुरुवात झाली आणि अ‍ॅरिस्टोटल व टोलेमीचे विश्व उलथून टाकले गेले व १७ व्या शतकात तर न्यूटनने पूर्ण जगाला हादरून टाकले व पूर्ण विज्ञानाला कलाटणी मिळाली. यानंतर या जगात आणखी काय शोधायचे राहिले आहे? असा प्रश्न पडू लागला.पण तरीही जशजशी वैज्ञानिक क्रान्ती होत गेली तसतश्या विज्ञानात येणार्‍या समस्याही वाढू लागल्या व अनेक नवनवीन प्रश्न पडू लागले. उदा. अणूचा शोध लागल्यावर 'अणूचे वस्तुमान किती असते? इलेक्ट्रोनमध्ये किती ऊर्जा असते? तसेच आपल्याला वीजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो असे का? हळूहळू या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली व वैज्ञानिक युगाला सुरुवात झाली.

मेरी क्युरी : संदर्भ ग्रंथ सूची

Saturday, September 10, 2011

 मेरी क्युरी साठी ही कविता :
These are the things that history forgets,
the things that women remember.

In the pale pre-dawn she rose,
her thoughts already busy,
pausing at breakfast to murmur “Dzien dobry”
to her daughter Irène and her Polish governess.

Marie too knew her way around a kitchen,
but she preferred to putter with stranger things,
which in later years left her cookbook and lab notes
so radioactive they must be kept in lead cases.
She worked in her lab all day, with her husband,
mixing ideas and endearments.
As the daylight waned, she would take out
the little tubes that shone with blue-green luminescence
and admire their beauty, all unknowing of the danger.

At home, Marie settled her daughter on her lap
and tucked her chin atop Irène’s soft, sweet curls.
She shared her day’s discoveries
and listened in turn to those of her daughter.
Then it was time to say “Dobranoc” and go to bed.

And that’s how a mother who earned two Nobel Prizes
raised a daughter to earn one of her own.

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका ( भाग - ५ )

    त्यानंतर अचानक पेरीच्या अपघाती मृत्युमुळे मेरी मनातुन फारच खचली. त्यानंतर लोकांनी तिच्यावर अनेक खोटे आरोप केले, त्यामुळे ती सायन्स परिषेदेवर निवडून जाऊ शकली नाही. तिने फ्रान्स मध्ये 'रेडियम संस्था' स्थापन केली व पहिल्या महायुद्धात एक्स - रे वाहनांची निर्मिती करुन हजारो सैनिकांचे प्राण वाचविले.
    पण मेरीने शोधलेले रेडियम हे किती धोकादायक आहे, हे लोकांनाच काय खुद्द मेरीलाच माहित नव्हते. ती खुशाल रेडियमची ट्युब खिशात घेउन फिरत असे , शेवटी होयचे तेच घडल़े किरणोस्तारामुळे मेरीला 'ल्युकोमिया' झाला व तिचा ४ जुलाई १९३४ रोजी मृत्यु झाला.
     मेरी क्युरी तिच्या साधेपणा, मानवतावाद आणि विज्ञानाबद्दलची ओढ यामुळे विज्ञानाच्या दुनियेत अमर झाली. पुढे मेरीच्या मुलींनी आईचे संशोधन चालु ठेवले व १९३५ मध्ये तिची मुलगी आयरिन व तिचा नवरा जोलिएट याने नोबेल मिळविले.

Friday, September 9, 2011

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका ( भाग - ४ )

  युरेनियममधून होणारया किरणोस्त्र्गातून खरेतर तीन प्रकारचे किरण मिळाले होते.काही किरण चुबक्त्वामुळे एका दिशेला वळत होते. रदरफोर्डने त्यातल्या घन ( + ) विद्युत्भार असणारया किरणांना 'अल्फा रेज' असे नाव दिले होते , तर निगेटिव्ह विद्युत्भार असणारया किरणांना 'बीटा रेज' असे नाव दिले गेले. किरण हे कणांनी बनले आहेत असे मानून त्यांतल्या कणांना संशोधक मग 'अल्फा कण' व 'बीटा कण' म्हणू लागले. त्यानंतर पौल विलार्ड याने चुबक्त्वामुळे दिशा न बदलणारे व आरपार जाणारे किरण शोधले आणि त्यांना 'Gamma rays' असे नाव दिले. नंतर रदरफोर्डने यावर संशोधन करून व 'किरणोत्सारी डीके' वापरून पृथ्वीचे वय काढले.
  मेरीचे संशोधन जगभरात प्रसिद्ध झाले. नोबेल कमिटीने मेरीच्या संशोधनाला मान देत तिला, बेह्क्रेलला व पेरीला नोबेल पारितोषिक दिले. ती हे पारितोषिक मिळवणारी पहिली स्त्रीसुद्धा ठरली. तिच्यानंतर ३५ वर्षे तरी कुठल्याही स्त्रीला नोबेल मिळाला नाही.त्यानंतर दहा वर्षांनी तिला पुन्हा नोबेल मिळाले. दोन नोबेल पारितोषिके मिळवणारी स्त्री अजूनतरी ( म्हणजे मेरीनंतर ) झालेली नाही.