Sunday, July 3, 2011

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग-६ )

     न्यूटन जेव्हा ग्रहतारे यांच्या हालचाली , अंतरे यांच्याविषयी निष्कर्ष काढण्यात गर्क होता तेव्हा त्याला गणित अपुरे पडायला लागले तेव्हा त्याने कलनशास्त्र ( Calculus ) हा गणिताप्रकार १६६५ - ६६ मध्ये विकसित केला .
     यानंतर न्यूटनने प्रकाशावर संशोधन केले. लोलकातून बाहेर येणाऱ्या रंगाविषयी त्याने लिहिले , पण ते प्रकाशित मात्र केले नाही. पूर्वीच्या विज्ञान जगतावर  अ‍ॅरिस्टॉटलचा खूपच प्रभाव होता.' प्रकाश हा एकजिनसी आहे' असे  अ‍ॅरिस्टॉटल माने. न्यूटनने मात्र प्रकाश किरण लोलकातून सोडला तेव्हा त्याचे अनेक रंगत विभ्जन झालेले होते. याचा अर्थ प्रकाश एकजिनसी नव्हताच मुळी !
     १६८३ साली एकदा एडमंड हँली ( धुमकेतू फेम ), रोबर्ट हुक व ख्रिस्तोफर रेन हे एकदा रात्रीचे जेवण घेत बसले असताना ग्रहांचे भ्रमण कसं असतं आणि त्याचं कारण यावर चर्चा सुरु झाली. रेनने हे कारण शोधणाऱ्याला ४० शिलिंगचे बक्षीसही जाहीर केले.हुकने सवयीप्रमाणे उत्तर माहित असल्याचा दावा केला.
हँलीला हुकचा नक्षा उतरवायचा होता. तेव्हा तो न्यूटनकडे गेला. न्यूटनने ' ते ग्रह लंबवर्तुळाकार फिरतात आणि हे मी गणिताने सिद्ध केलंय, पण त्याचे कागद मिळत नाहीयेत' असे करून हँलीला फुटवले. खरे तर त्याचे कागद हरवलेले नव्हते, पण त्याला आपले संशोधन प्रकाशित करायला आवडत नसे. मग हुकची जिरवण्यासाठी  हँली प्रयत्न करतोय हे कळल्यावर इतकी वर्षे लपून ठेवलेले संशोधन न्यूटनने प्रकाशित करायचे ठरवले.यातूनच ' प्रिन्सिपिया' या ग्रंथाची निर्मिती झाली ते आपण पुढे बघू.

No comments:

Post a Comment