Saturday, July 2, 2011

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग- 5 )

     न्यूटनने आपण एका पर्वतावर जाऊन बसलोय अशी कल्पना केली. तिथे बसून आपण एक दगड फेकला तर तो कुठेतरी पडेल. आणखी जास्त जोर लाऊन फेकला तर तो आणखी जास्त दूर जाऊन पडेल आणि त्यापेक्षाही आणखी जोर लावला तर आणखीनच दूर ! आणि यानंतर त्याच्या विचारांची झेप अफाट होती. आपण जर तो दगड खूपच प्रचंड जोरात फेकला तर तो कदाचित परतही येणार नाही ; ज्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो दगड फेकला तर तो पृथ्वीपासून सटकून निघून जाईल , त्याला ' निस्त्न्याचा वेग ' किंवा मुक्तिवेग ( Escape Velocity ) असे म्हणतात. दगड फेक्ण्याकर्ता आपण जे बल वापरतो , त्यामुळे त्याला मिळणाऱ्या गतीमुळे तो पृथ्वीपासून दूर जातो आणि गुरुत्वाकार्षाणामुळे तो पृथ्वीकडे परत खेचला जातो. या दोन बलांपैकी कुठला मोठा यावर तो कसा जाईल ........, म्हणजे पृथ्वीकडे परत येईल का पृथ्वीपासून दूर जाईल हे ठरेल. आणि जर हे दोन बल सारखे असतील  तर तो दगड पृथ्वीपासून दूरही जाणार नाही आणि पृथ्वीकडे खेच्लाही जाणार नाही , तर तो दगड पृथ्वीभोवती एका कक्षेत चक्क फिरत बसेल! मग ग्रहांचे भ्रमण यामुळेच तर होत नाही ? 

No comments:

Post a Comment