Sunday, October 9, 2011

प्रकाशाचा वेग: एक चिंतन


  न्यूटनंतर लोकांना वाटू लागले'न्यूटन हा सर्वश्रेष्ठ संशोधक आहे,'पण अल्बर्ट आईनस्टाइनच्या संशोधनामुळे व त्याने मांडलेल्या सिद्दातांने न्यूटनचे काही संशोधन मोडित काढले. तेव्हा वाटु लागले आईनस्टाइनचे संशोधन  खोडुन काढणे अशक्य आहे. पण ज्याप्रमाणे विक्रम हे मोडण्यासाठीच असतात त्याप्रमाणे संशोधनसुध्दा नवीन संशोधन करण्यासाठीच असते पण म्हणुन पहिले संशोधन किंवा पहिला संशोधक मूर्ख ठरत नाही ज्याप्रमाणे सचिन व ब्रॅडमन यामध्ये श्रेष्ठ कोण? असा प्रश्न कोणी मला विचारते तेव्हा मी तरी असे उत्तर त्याला देतो की 'दोघेही आपापल्या काळात श्रेष्ठ आहेत कोणी नीच नाही तर कोणी उच्च नाही' हेच न्युटन व आईनस्टाइनबद्द्ल किंवा इतर संशोधकांबद्दल आहे. त्यामुळे कुठल्याही संशोधकांची तुलना करु नये केल्यास ती काळानुरुप करावी, असो मी काय उगीच माझी टहाळकी सांगत बसलो मुळ मुद्दा राहिला बाजूला.
   नुकतेच सर्न येथील संशोधकांनी आईनस्टाइनच्या एका सिद्धांताला आव्हान दिले, मी मुद्दामच 'आव्हान' हा शब्द वापरला आहे कारण ते आव्हान अजून सिद्ध झालेले नाही पण ते सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे.१९०५ मध्ये आईनस्टाइनने त्याच्या सापेक्षतावादानुसार काही नियम मांडले त्यानुसार प्रकाशाचा वेग हा स्थिर आहे तसेच या विश्वात कुठल्याही इतर भौतिक गोष्टींपेक्षा प्रकाशाचा वेग हा सर्वोच्च आहे, असे त्याचे म्हणणे होते. पण त्याआधी सुद्धा काही संशोधकांनी हे म्हणणे मांडले होते. त्यामुळे जवळजवळ आतापर्यंत लहान मुलानांही महित होते की प्रकाशाचा वेग सर्वोच्च आहे त्यामुळे विश्वातील मोठी अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिमाण अस्तित्वात आले. पण २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्न येथील संशोधकांनी जग हादरुन टाकले, त्यांना एक वेगळीच गोष्ट कळाली. अलीकडे व शोध लागलेल्या 'न्यूट्रिनोंन्स' या अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करण्यासाठी व त्याचा वेग मोजण्यासाठी 'Opera' या प्रकल्पासाठी सुमारे ५० संशोधक कार्यरत होते. २३ सप्टेंबर
या दिवशी त्यांनी हे अतिसूक्ष्म कण सर्न ( स्वित्झर्लंड ) पासून ग्रान सासो ( इटली ) पर्यंत सोड्ले आणि चक्क या कणांना हे अंतर कापायला प्रकाशापेक्षा ६० नॅनोसेकंद कमी लागले, तेसुद्धा या
कणांचा मार्गात भुगर्भाच्या एका पापूद्र्यासारखे घन पदार्थही होते.त्यामुळे कदाचित त्यांचा वेग मंदावला असू शकेल.

No comments:

Post a Comment