Sunday, July 10, 2011

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका ( भाग - १ )

     आपल्या शोधांनी विज्ञानाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या व दोन नोबेल पारितोषिके जिंकणाऱ्या मारी क्युरी या कर्तबगार स्त्रीचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ रोजी वॉर्सा ( पोलंड ) येथे झाला. तिचे वडील विज्ञान आणि गणित शिकवत , तर आई पियानो वाजवत. मेरी क्युरीचे मुल नाव मान्या स्क्लोडोव्ह्स्का.
     पाच वर्षे नोकरी करून मान्याने आपल्या बहिणीला ब्रोन्याला शिकविले व नंतर स्वत: फ्रान्समध्ये जाऊन शिकली. त्यात अवघ्या सतराव्या वर्षी झालेल्या प्रेम- भंगामुले ती मनातून खचली होती. पण विज्ञानाच्या सुदैवाने, विज्ञानाच्या प्रेमाने तिला वाचवले.
     त्यानंतर पॅरिसच्या प्रयोगशाळेत तिची भेट पेरी क्युरीशी झाली. तो त्यावेळी त्याच्या भावाबरोबर 'स्फटिक' ( क्रिस्टल ) हा खूप दाबाखाली वीज कशी निर्माण करतो, यावर संशोधन करत होता. लवकरच या दोघांचे प्रेम जमले आणि हे दोघे २६ जुलै १८९५ रोजी विवाहबद्ध झाले. याचवेळी बेह्क्रेलला युरेनियमच्या क्षारातून कसलेतरी उत्सर्जन ( Radiation ) होतंय असं आढळले होते आणि त्यावर संशोधन करायला मेरीला पाचारण केले होते. मेरीने हेन्री बेह्क्रेलबरोबर युरेनियम क्षारातून निघणाऱ्या त्या गूढ उत्सर्जनावर काम करायला सुरुवात केली.पेरी ( प्येर ) व मारी ( मेरी ) हि एक अफलातून जोडी होती. प्येर अतिशय  खोडकर व खटयाळ होता, तर मेरी अतिशय शांत व गंभीर स्वभावाची होती.
     या प्रयोगात प्येरही मेरीला मदत करत असे. आता क्युरी दांपत्याने शास्त्राच्या इतिहासात एका प्रचंड मोठया प्रयोगाला सुरुवात केली होती. यासाठी प्रचंड परिश्रम व चिकाटीची गरज होती. युरेनियम ऑक्साईड असलेला पिंचब्लेंड क्षार उकळवून क्युरी दांपत्याने त्याचे शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांना तासनतास लोखंडी स्टोव्ह्समोर बसावे लागे. जेव्हा त्यांना त्या जालामुळे घुसमटायला होई तेव्हा ते आपली जागा बदलत असत.
    






No comments:

Post a Comment