Thursday, August 4, 2011

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका ( भाग - ३ )

   उरलेल्या गाळाचे शुद्धीकरण आणि स्फटिकीकरण त्यांनी चालूच ठेवले. अतोनात परिश्रमानंतर शेवटी त्यांना त्यातूनच आणखी एक मूलद्रव्य सापडले. आणि बेह्क्रेलला पडलेले कोडे एकदमच सुटले. या नवीन मूलद्रव्याचे नाव त्यांनी 'रेडियम' असे ठेवले. रेडियम अतिशय विचित्र प्रकारचे मूलद्रव्य होते. युरेनियमच्या ते दहा लाख पटीने रेडिओअ‍ॅक्टीव होते. रेडियम काळ्या कागदात गुंडाळले तरी ते आजूबाजूच्या पदार्थांवर परिणाम करायचे. त्यापासून निघणारे किरण, जंतूच नव्हे तर वनस्पती, प्राणी यांचाही नाश करू शकायचे. ते पेशी नष्ट करू शकल्यामुळे त्यांचा कर्करोग उपचारासाठी उपयोग होईल असे वाटायला लागले आणि तसेच झाले.त्यावेळी रेडियमची किंमत दर ग्रमला ७० लाख रुपये होती. मेरी क्यूरीने आपल्या या शोधाबद्दल अर्जही केला नाही. रेडियममधून सतत उर्जा बाहेर पडत असते. बाहेरुन प्रकाश किंवा अन्य मार्गाने उर्जा न मिळ्ताही ही उर्जा कशी बाहेर पड़ते याचे कोडे बरेच दिवस संशोधकांना पडले होते. शेवटी आइनस्टाइनने ते सोडवले रेडियमच्या वस्तुमानाचे ( m ) उर्जेत ( E ) प्रसिध्द समीकरणाप्रमाणे E = mc2 रुपान्तर होत होते. यालाच 'रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी' म्हणतात.