Tuesday, July 5, 2011

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग-७ )

   प्रिन्सिपिया या ग्रंथाने विज्ञानाचा चेहरामोहराच बदलून गेला. लँटिन भाषेत लिहिलेले हे पुस्तक म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातील सर्वोत्तम पुस्तक होते. त्याकाळी 'प्रिन्सिपिया' खूप कमी लोकांना कळले. न्यूटनने मुद्दामूनच हे पुस्तक अतिशय अवघड भाषेत व अवघड पद्धतीने लिहिले होते, आपले पुस्तक खूपच कमी लोकांना कळावे असे न्यूटनला  वाटे. पण त्यानंतर त्याने लिहिलेले ' दि प्रोफेसीज' हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले.
 'प्रिन्सिपिया' मुले न्यूटन रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला. १७०५ साली त्याला इंग्लंडची राणी 'अ‍ॅन' हिच्या हस्ते 'नाईटहूड' या सर्वोत्तम पुरस्कार व 'सर' या किताबाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला वैज्ञानिक ठरला. 
  या सुमारास एक गमंतशीर गोष्ट घडली. न्यूटनने टाकसाळीत काम करायला सुरुवात केल्यावर त्याचा आता गणित आणि विज्ञानाची संबंध राहिला नव्हता, त्यामुळे 'न्यूटन आता संपलाय' अशीच सगळ्यांची समजूत झाली होती. पण जॉन बर्नोली या गणिततज्ञाने एक गणितातले अवघड कोडे जगातल्या सर्व गणितीयांना टाकले. न्यूटनने या अतिशय अवघड कोड्याचे उत्तर अवघ्या २ दिवसात सोडवून बर्नोलीकडे पाठवून दिले ते पाहून बर्नोली चाट पडला ' हे कोडे कोण सोडवेल हे मला माहित होते', हे तर मला वाघाचे पंजे दिसतायेत! असे उद्दगार बर्नोलीने काढले होते.
   असा हा जगविख्यात संशोधक २० मार्च १७२७ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. 

No comments:

Post a Comment