Friday, September 9, 2011

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका ( भाग - ४ )

  युरेनियममधून होणारया किरणोस्त्र्गातून खरेतर तीन प्रकारचे किरण मिळाले होते.काही किरण चुबक्त्वामुळे एका दिशेला वळत होते. रदरफोर्डने त्यातल्या घन ( + ) विद्युत्भार असणारया किरणांना 'अल्फा रेज' असे नाव दिले होते , तर निगेटिव्ह विद्युत्भार असणारया किरणांना 'बीटा रेज' असे नाव दिले गेले. किरण हे कणांनी बनले आहेत असे मानून त्यांतल्या कणांना संशोधक मग 'अल्फा कण' व 'बीटा कण' म्हणू लागले. त्यानंतर पौल विलार्ड याने चुबक्त्वामुळे दिशा न बदलणारे व आरपार जाणारे किरण शोधले आणि त्यांना 'Gamma rays' असे नाव दिले. नंतर रदरफोर्डने यावर संशोधन करून व 'किरणोत्सारी डीके' वापरून पृथ्वीचे वय काढले.
  मेरीचे संशोधन जगभरात प्रसिद्ध झाले. नोबेल कमिटीने मेरीच्या संशोधनाला मान देत तिला, बेह्क्रेलला व पेरीला नोबेल पारितोषिक दिले. ती हे पारितोषिक मिळवणारी पहिली स्त्रीसुद्धा ठरली. तिच्यानंतर ३५ वर्षे तरी कुठल्याही स्त्रीला नोबेल मिळाला नाही.त्यानंतर दहा वर्षांनी तिला पुन्हा नोबेल मिळाले. दोन नोबेल पारितोषिके मिळवणारी स्त्री अजूनतरी ( म्हणजे मेरीनंतर ) झालेली नाही.                             



No comments:

Post a Comment