Saturday, September 10, 2011

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका ( भाग - ५ )

    त्यानंतर अचानक पेरीच्या अपघाती मृत्युमुळे मेरी मनातुन फारच खचली. त्यानंतर लोकांनी तिच्यावर अनेक खोटे आरोप केले, त्यामुळे ती सायन्स परिषेदेवर निवडून जाऊ शकली नाही. तिने फ्रान्स मध्ये 'रेडियम संस्था' स्थापन केली व पहिल्या महायुद्धात एक्स - रे वाहनांची निर्मिती करुन हजारो सैनिकांचे प्राण वाचविले.
    पण मेरीने शोधलेले रेडियम हे किती धोकादायक आहे, हे लोकांनाच काय खुद्द मेरीलाच माहित नव्हते. ती खुशाल रेडियमची ट्युब खिशात घेउन फिरत असे , शेवटी होयचे तेच घडल़े किरणोस्तारामुळे मेरीला 'ल्युकोमिया' झाला व तिचा ४ जुलाई १९३४ रोजी मृत्यु झाला.
     मेरी क्युरी तिच्या साधेपणा, मानवतावाद आणि विज्ञानाबद्दलची ओढ यामुळे विज्ञानाच्या दुनियेत अमर झाली. पुढे मेरीच्या मुलींनी आईचे संशोधन चालु ठेवले व १९३५ मध्ये तिची मुलगी आयरिन व तिचा नवरा जोलिएट याने नोबेल मिळविले.

No comments:

Post a Comment