Monday, September 12, 2011

आइनस्टाइन पूर्वीचे विज्ञान

    १५ व्या शतकापासून वैज्ञानिक क्रान्तीला सुरुवात झाली आणि अ‍ॅरिस्टोटल व टोलेमीचे विश्व उलथून टाकले गेले व १७ व्या शतकात तर न्यूटनने पूर्ण जगाला हादरून टाकले व पूर्ण विज्ञानाला कलाटणी मिळाली. यानंतर या जगात आणखी काय शोधायचे राहिले आहे? असा प्रश्न पडू लागला.पण तरीही जशजशी वैज्ञानिक क्रान्ती होत गेली तसतश्या विज्ञानात येणार्‍या समस्याही वाढू लागल्या व अनेक नवनवीन प्रश्न पडू लागले. उदा. अणूचा शोध लागल्यावर 'अणूचे वस्तुमान किती असते? इलेक्ट्रोनमध्ये किती ऊर्जा असते? तसेच आपल्याला वीजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो असे का? हळूहळू या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली व वैज्ञानिक युगाला सुरुवात झाली.

No comments:

Post a Comment