Monday, June 13, 2011

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग- ३ )

  यानंतर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाची नवीन थिअरी मांडली. वूल्ज्थोर्पला एका झाडाखाली बसला असताना एक सफरचंद पडताना त्याने पाहिले , आता सफरचंद खाली पडण्याचा प्रसंग हा काही वेगळा नव्हता, पण न्यूटनला तो वेगळा वाटला ,त्याने स्वत:शीच एक प्रश्न विचारला की , चंद्र पृथ्वीभोवती  फिरताना 
सरळ रेषेत का निघून जात नाही ? तसेच सर्व ग्रह सूर्याभोवती का व कसे फिरतात ?  शिवाय त्याला असेही वाटले की  ते बल जर झाडाच्या उंचीएवढ्या अंतरावर लागू पडत असेल , तर मग ते आणखी दूरपर्यंत लागू पडेल. अगदी वेगळ्या ग्रहापर्यंतही ! आणि मग त्याने त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या द्वारे सगळ्या ग्रहांच्या हालचाली , भ्रमणे यांच्यावर विचार करून गणिते मांडायला सुरुवात केली. हा चंद्र सरळ रेषेत निसटून न जाता  गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे आकर्षिला जातो. पण फळाप्रमाणे पृथ्वीवर आदळत नाही. गोफणीला लावलेला दगड केंद्रयामी ( Centripetal ) बलामुळे जसा आपल्याभोवती गोल फिरतो तसाच काहीसा गुरुत्वाकार्ष्णामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. एका क्षणार्धात हे विश्व चालवणारे ते अदृश्य बल ( Force ) न्यूटनने शोधून काढले होते.

No comments:

Post a Comment