Thursday, June 9, 2011

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग- २ )

     १६६६ साली बल किंवा फोर्सेसची कल्पना मांडून न्यूटनने अ‍ॅरिस्टॉटलच्या कल्पनांचे राज्य उलथून टाकले. त्याने गतीचे ( Motion ) तीन नियम मांडले. त्याने मांडलेल्या समीकरणांचा उपयोग करून आता अतिशय अचूकपणे पुष्कळ हालचालीविषयी भाकीत करता यायला लागली. अ‍ॅरिस्टॉटलने काही शतकापूर्वी असे मांडले होते की सगळ्या निर्जीव वस्तूही सजीव वस्तुचेच अनुकरण करतात आणि त्याप्रमाणे हालचाल करतात. न्यूटनच्या नियमांमुळे त्या वस्तूंची इच्छा किंवा भावना काय आहेत आणि त्याप्रमाणे ते केव्हा कुठे पडतील किंवा कुठून कुठे आणि कसे जातील याविषयी उगाचच तर्क करत बसण्यापेक्षा आता त्याचे गतीचे नियम वापरून अचूकपणे त्यांच्या गतीविषयी बोलणे शक्य झाले. प्रत्येक खाली येणार्‍या दगडाचा किंवा पानाचा प्रवासमार्ग ( Trajectory ) हा त्यांचावरचा बलांची बेरीज करून आपल्याला आता काढता येऊ लागला. याचा औद्योगिक क्रांतीमध्ये आणि अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये उपयोग होणार होता. वाफेच्या इंगीनाची शक्ती असो , जहाजांची हालचाल किंवा वेग असो व कुठल्याही मोठ्या इमारतीतील कुठलीही वीट असो , या सर्वांवरील ताण ( Stress ) , घर्षण ( Friction ) , आणि इतर अनेक बलांचा विचार करूनच अनेक यंत्रांची रचना करणे शक्य होणार होते , आणि त्याच्या हालचालींविषयी भाकितही !

No comments:

Post a Comment